आताच शेअर करा

दिनांक: ३० सप्टेंबर २०२५

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

रेडी येथील ”श्री देव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळ” आयोजित नवरात्र उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवून सर्व भाविक भक्तांना तसेच गावातील स्थानिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विशाल परब यांचा शाल श्रीफळ देऊन गावचे सरपंच भाई राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      यावेळी बोलताना विशाल परब यांनी मंडळाला धार्मिक एकोपा जपल्याबद्दल सर्व मंडळाचे तसेच गावातील सर्व स्थानिकांचे कौतुक केले.या कार्यक्रमाला सावळाराम गोसावी, प्रभाकर मामलेकर, प्रीतम मामलेकर, सागर राणे, प्रशांत गवंडी आबा गोसावी, भजरवीर गोसावी, अजित पडवळ, तसेच मंडळाचे इतर कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *