
दिनांक: ५ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी व डेगवे येथील रहिवाशी असणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर हा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत असून त्याचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी लहान वयापासून सर्वज्ञच्या कलागुणांची जोपासना असल्याची जाणीव झाल्यानंतर तो वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आतापर्यंत त्याने तालुका, जिल्हा व राज्य, आंतरराज्य तसेच जागतिक पातळीवर वेगळ्या स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त करून आपल्या शाळेचा तसेच गावचा नावलौकिक वाढवलेला आहे .
सर्वज्ञला लहानपणापासून गायन कलेची आवड असून त्याच्या सुप्त कलागुणांना पीएम श्री बांदा नं.१केंद्र शाळेत व्यासपीठ मिळाले.त्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत ४०० हून बक्षीस मिळवलेली आहे. तो उत्तम प्रकारे भजन गायन करतो त्याने अनेक अभंग गायन स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.विविध प्रकारच्या ऐतिहासिक तो वेशभूषा साकारून वेशभूषा स्पर्धांमध्ये सर्वज्ञने बक्षीसांची लयलूट केली आहे. संभाजीची महाराजांची भूमिका तो हूबेहूब साकारतो.छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अंगावर शहारे निर्माण करतो. जिल्हा व राज्यस्तरीय कथाकथन,काव्यगायन ,नाट्यगायन, एकपात्री अभिनय व वक्तृत्व स्पर्धत सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतही सर्वज्ञने क्रमांक प्राप्त केला आहे.सर्वज्ञचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून रामरक्षा,श्लोक पाठांतर,गणपती स्तोत्र , अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र स्पर्धेतही त्याने सहभागी होऊन सुयश मिळवले आहे. सर्वज्ञ हा लग्नकार्यात सुमधुर मंगलाष्टके देखील म्हणतो.जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या दिवाकर नाट्यछटा स्पर्धेतही सर्वज्ञने सुयश मिळवलेले आहे. सर्वज्ञ हा ऑनलाईन विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. शालेय विविध स्पर्धा परीक्षेतही सर्वज्ञ प्रविष्ट होत असतो.त्याच्या विविध स्पर्धातील यशाची दखल घेऊन त्याला अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेच्या वतीने अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी म्हणून त्याला आळंदी येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.मातृभूमी शिक्षण संस्था यांच्या वतीने सर्वज्ञच्या कार्याची दखल घेऊन गोवा येथील भरगच्च कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. सफर ३५०गडकोट संस्थेच्या वतीने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल मुंबई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.सर्वज्ञला त्यांचे वडील सुर्यकांत वराडकर वआई श्रेयशी काका चंद्रशेखर व काकी मिलन वराडकर यांचा वारसा तसेच गावातील ग्रामस्थ डेगवे येथील प्रसिद्ध बुवा तात्या स्वार आदि विविध गुरूजनांचे मार्गदर्शन त्याला मिळत आहे सध्या क्लासिकल संगीताचे धडे वीणा दळवी यांच्या कडून घेत आहे.बांदा केंद्रशाळेतही सर्वज्ञला नेहमी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ उपशिक्षक जे.डी.पाटील , रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत,स्नेहा घाडी, जागृती धुरी,मनिषा मोरे, कृपा कांबळे,प्रसेनजित, सुप्रिया धामापूरकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.