
दिनांक: १७ ऑगस्ट २०२५
बांदा प्रतिनिधी: श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत डेगवे, विविध कार्यकारी सोसायटी डेगवे, स्थापेश्वर विद्याविकास मंच, सरस्वती चुडे प्रतिष्ठान यांच्या मार्फत १० वी, १२ वी च्या बोर्ड परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना श्री देव स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या स्थापेश्वर विद्या विकास मंच यांच्या सौजन्याने गणवेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर सर्वश्री माजी सभापती भगवानराव देसाई, सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, शालेय समिती सदस्य श्री प्रवीण देसाई, श्री भरत देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आबा देसाई, विश्वनाथ देसाई, मधुकर देसाई, उत्तम देसाई, श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंचचे संस्थापक पी. एन. तेली सर तसेच माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उपस्थित विनोद देसाई, सुशील देसाई, भीमसेन देसाई पालक-शिक्षक संघाचे कार्यकारणी सदस्य श्री सुदन मेस्त्री, सौ श्रेया देसाई,ग्रामपंचायत सदस्या सौ प्रगती देसाई, पोलीस पाटील श्री गजानन देसाई, सौ वैष्णवी केसरकर, पडवे माजगावचे माजी सरपंच लक्ष्मण गवस तसेच डेगवे, पडवे माजगाव, मोरगाव, आडाळी, डिंगणे धनगरवाडी, कळणे या गावातील पालक वर्ग तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.के. सावंत सर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन याची धुरा श्री ए. एच. मगदूम सर आणि सौ यशदा देसाई मॅडम यांनी सांभाळली.