आताच शेअर करा

दिनांक: १५ जुलै २०२५

सावंतवाडी:  ओटवणे देऊळवाडी येथील आणि सध्या मुंबई अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस शांतीलाल कंपाऊंड येथे राहणाऱ्या तारामती शंकर गावकर (७७) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या नावे ताशंगा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असुन या प्रतिष्ठानच्यावतीने विविध उपक्रम सुरू आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे सरचिटणीस रामचंद्र गावकर यांच्यासह ओटवणे गावातील चाकरमानी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर मुंबईत अंधेरी पार्शिवाडी हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभाग सचिव तथा ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे कार्याध्यक्ष गणपत गावकर आणि फ्लिपकार्ड कंपनीतील लिपिक विजय गावकर यांच्या मातोश्री तसेच मुंबईस्थित अर्जुन गावकर व ओटवणे येथील संतोष गावकर यांच्या त्या काकी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पाच मुली, सुना, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *