
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक: १५ जुलै २०२५
सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेला यशाच्या शिखरावर नेल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, भाजप सरचिटणीस महेश सारंग, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, शहर अध्यक्ष साई सावंत, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, बांदा माजी सरपंच दीपक सावंत, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.