
दिनांक: १ जुलै २०२५
न्हावेली / वार्ताहर
मातोंड रोडवर असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या तळवडे शाखेचे स्थलांतर होऊन बाजारपेठेत नव्याने शाखा सुरू करण्यात आली. पुर्वीच्या जुन्या जागेत बॅंकसह एटीएमची सुविधा उपलब्ध होती मात्र आता नवीन शाखेत एटीएम ची सुविधा अद्याप सुरू केली नसल्याने स्थानिक ग्राहकांची पैसे काढण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. परीणामी त्यांना बॅंकेत स्लीप भरून रांगेत उभे राहून आपल्या हक्काचे पैसे काढावे लागत आहेत.त्यामुळे ग्राहकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक खरेदी करण्यासाठी तात्काळ पैसे मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.दुसरीकडे, “एटीएम नसल्याने ग्राहक बँकेत गर्दी करतात, आणि बँक कर्मचारीसुद्धा त्रस्त होतात,” त्यामुळे लवकरात लवकर नव्या शाखेच्या परीसरात एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी आग्रही मागणी व्यापारी व ग्राहकांनी केली आहे.