
दिनांक: ३० जून २०२५
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
महाराष्ट्र सरकारने १६ एप्रिल २०२५ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता.त्यामध्ये त्यांनी पहिली पासून त्रि भाषा सक्तीचा निर्णय घेतला होता .त्रि भाषा म्हणजे आता महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून पहिली पासून पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून नवे युद्ध पेट घेत होते. युती सरकार सोडले तर सर्वच पक्षांचा हया शासन निर्णयाला विरोध होता. परंतु उ. बा. ठा. आणि मनसे या दोन्ही पक्षाने या निर्णया विरोधात येत्या पाच जुलै ला ठाकरे बंधूंनी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही पाठिंबा जाहीर केला होता.
शैक्षणिक दिग्गज अभ्यासकाचा या निर्णयाला विरोध होता.
ह्या सर्व बाबींवर विचार करत सरकारने काढलेला जी आर मागे घेऊन हिंदी तिसरी भाषा महाराष्ट्राच्या शिक्षणात अनिवार्य नाही असा जी आर रद्द करून दुसरा नवीन निर्णय जाहिर केला. हया जी. आर. बदलण्याच्या निर्णयाला ठाकरे बंधूंनी मोर्चाचा दिलेल्या इशाऱ्यामुळेच सरकार घाबरुन मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे आज मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा विजय झाल्यामुळे बांदा श्रीराम चौक येथे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून व उपस्थित जनतेला मिठाई वाटप करून आनंद साजरा केला यावेळी उपस्थित उ. बा. ठा. बांदा शहर प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, रियाज खान, खान सर, प्रशांत पांगम,ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके, रितेश नाटेकर, नागेश बांदेकर, राजदीप पावसकर, साईनाथ करमळकर, विशु पावसकर, अनिल नाटेकर, सुनील नाटेकर आत्माराम बांदेकर, प्रदीप कळगुटकर मनसेचे मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, उप तालुका अध्यक्ष सुनील आसवेकर, विभाग अध्यक्ष विष्णू वसकर शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, उपस्थिती होते.