आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी:संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: ८ जून २०२४

दोडामार्ग, सावंतवाडी आणी गोव्या करिता बांदा बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून तिथून पुणे, मुंबई, गोवा, लातूर अशा अनेक बसेस मार्गस्थ होतात. मात्र हे मध्यवर्ती ठिकाण असूनही प्रवासी वर्दळ जास्त असूनही सदर बस स्थानकावर बस आरक्षण (बुकिंग) करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर जाण्याकरिता बस आरक्षण करण्याकरिता मुद्दाम म्हणून खर्च करून वेळेचा अपव्यय करून सावंतवाडी बस स्थानक गाठावे लागते. सध्या बांदा बस स्थानाकात दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक आहे. शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी विध्यार्थाना दोन्ही सत्रात पास वितरित केले जावेत. पास नाकारू नयेत. तसेच बांदा बस स्थानकावर गाड्यांची वेळ अनाउंस कारण्याकरिता साऊंड सिस्टीम उपलब्ध नाही. अशा अनेक समस्या बांदा बस स्थानकला भेडसावत आहेत. तरी याकडे लोक प्रतिनिधी तसेच एस टी च्या वरिष्ठ अधीकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. महामंडळाने बस स्थानक स्वच्छता आणि इतर बाबी करिता बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबविले होते त्यात या गोष्टी अंतरभूत होत्या मात्र त्याकडेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तरी त्वरित बस आरक्षणाकारिता बुकिंग सिस्टीम आणि अनाउंस सिस्टीम त्वरित सुरु करावी, जेणेकरून प्रवाशांना याचा फायदा होईल. असे निवेदन बांदा एस टी आगार व्यवस्थापक यांना उ बा ठा चे अल्पसंख्याक उप जिल्हाअध्यक्ष रियाज खान यांनी दिले.यावेळी श्री. राजा खान, गिरीश नाटेकर, साहिल खोबरेकर, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, राहुल माने, रफिक शेख, आणि नानू शेरलेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *