आताच शेअर करा

दिनांक: २ मे २०२५

सावंतवाडी: कुणकेरी शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करीत गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे.
       या शाळेतील आराध्या बापू झोरे (इ ३ री) या विद्यार्थिनीने एसटीएस परीक्षेत १७४ गुण मिळवित गोल्ड मेडल पटकावताना तालुक्यात ६ वा तर जिल्ह्यात २६ गा क्रमांक पटकाविला. तसेच ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ९० मिळवताना ब्राँझ मेडल पटकावले. तर गुरुकुल परीक्षेत २१६ गुण जिल्ह्यात १७ वा तर राज्यात ३४ वा क्रमांक पटकावला. आर्यन बाबू झोरे (इ१ ली) याने ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ९० गुण मिळवीत सिल्वर मेडल तर गुरुकुल परीक्षेत ८८ गुण मिळवीत जिल्ह्यात २ रा क्रमांक तर राज्यात ७ वा क्रमांक पटकाविला. तसेच सार्थक रामदास झोरे (इ ४ थी) याने एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत १७० गुण तर ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये ५२ गुण आणि सौम्या रामदास झोरे (इ २री ) हिने ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये ५२ गुण तर एसटीएस परीक्षेत ७६ गुण मिळवित उज्वल यश संपादन केले.
         तसेच या शाळेतील आराध्या झोरे व आर्यन झोरे या विद्यार्थ्यांनी अबॅकस परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कल्पना बोडके यांनी या विद्यार्थ्यांचे खास शाळेमध्ये जात अभिनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनिल परब, ग्रामपंचायत सदस्य भगवान सावंत, अंकिता सावंत, केंद्रप्रमुख म ल देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ऋतुजा झोरे, उपाध्यक्ष बाबू झोरे, निकिता परब, सूर्यकांत सावंत, राजन मडवळ, लक्ष्मण सावंत, महादेव गावडे, नाना  गावडे यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *