दिनांक: ३६ एप्रिल २०२५
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड येथे युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने ३० एप्रिल ते ४ मे असा मळेवाड जकातनाका येथे मळेवाड सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. या महोत्सवात ३० एप्रिल रोजी सायंकाळी तीन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सत्यनारायण पूजा,रात्री ठीक सात वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्य प्रयोग,१ मे रोजी सकाळी नऊ वाजता मळेवाड आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर तर दुपारी अडीच वाजता जिल्हास्तरीय बैलगाडी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.२ मे रोजी रात्री ठीक नऊ वाजता वेशभूषा स्पर्धा,रेकॉर्ड डान्स स्पर्धा व मळेवाड कोंडुरे महिला मंडळाची विनोदी एकांकिका सादर होणार आहे. ३ मे रोजी रात्री ठीक नऊ वाजता जिल्हास्तरीय खुली ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. महोत्सव सांगता दिवशी म्हणजेच ४ मे रोजी रात्री नऊ वाजता कोकण सुंदरी २०२५ ही सौंदर्य स्पर्धा,महिलांसाठी स्मार्ट सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी वरील सर्व कार्यक्रमांचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच तथा मंडळ अध्यक्ष हेमंत मराठे यांनी केले आहे
