
दिनांक: २५ एप्रिल २०२५
सावंतवाडी /प्रतिनिधि
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा सावंतवाडी सिंधुदुर्ग तसेच महिला सेल आयोजित केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेत टॉप टेन यादीत आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही समाजाभिमुख संघटना असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने झटणारी आणि नीतीमूल्ये जोपासणारी अशा सर्वांना आदर्श ठरणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्य नेहमीच गौरवास्पद असते. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणारी एकमेव संघटना म्हणून उल्लेख केला जातो. शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी सांभाळून कोरोना सारख्या महाभयंकर स्थितीत अनेक घटकांपर्यंत पोहोचून वस्तू तसेच आर्थिक स्वरूपात मदतीचा हात देऊन प्राथमिक शिक्षक संघटनेने महत्त्वाची भूमिका सांभाळत माणुसकीचा धडा इतरांनाही दाखवून दिला.
दि स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवॉर्ड ठरलेल्या टॉप टेन यादीतील विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीरा घाडी( सावंतवाडी 4) मानवी घाडी (सावंतवाडी 4) दुर्वा नाटेकर (बांदा 1),शिवराज राऊळ (सावंतवाडी 2), रिया सावंत( इन्सुली 5 ),आराध्या परब (कोलगाव 2),चंद्रकांत गावकर (ओटवणे4), पार्थ बोलके (सावंतवाडी 4),शंकर परब ( कारिवडे पेडवे) मेघना सावंत (माडखोल धवडकी) इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन मिळवलेल्या यशाबद्दल प्रोत्साहन बक्षीस योजनेच्या कार्यात प्राथमिक शिक्षक संघटनेचे विशेष कौतुक विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर यांनी केले.तसेच विद्यार्थ्यांमधून भविष्यात प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत यासाठी विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून मुलांच्या यशाचे कौतुक करणारी आणि प्रोत्साहन देणारी प्राथमिक शिक्षक संघटना देशपातळीवरील संघटनेची संलग्न राहून कौतुकास्पद कार्य करीत असल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष तथा विश्व शब्दकोश मंडळाचे सदस्य म. ल. देसाई यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षक संघटना शाखा सावंतवाडी चे शैक्षणिक,सामाजिक कार्य प्रेरणादायी असून आदर्शवत आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष राजाराम कविटकर यांनी केले. .
प्राथमिक शिक्षक महिला कला मंच यांच्यावतीने स्वागत गीताने रंगत आणली. तर सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने कलागुणांचा कलाविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकली.या कलाविष्कारामध्ये महाराष्ट्राची लोकसंस्कृती लक्षवेधी ठरली.
यावेळी महिला सेल अध्यक्षा शुभेच्छा सावंत,जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे,जिल्हा महिला सेल अध्यक्ष संजना ठाकूर,सरचिटणीस जिल्हा महिला सेल सीमा पंडित, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, नरेंद्र सावंत,जिल्हा उपाध्यक्ष वळवी, अरुण माडगुत, भिवा सावंत,शिक्षक पतपेढी संचालक सुभाष सावंत, मृगाली पालव,महेश सावंत, संजय शेडगे,तालुका अध्यक्ष विजय गावडे सचिव रुपेश परब, नेहा सावंत,तेजस बांदिवडेकर, प्रसाद गावडे, संतोष गवस, भिकाजी गावडे,ज्ञानेश्वर सावंत, उज्वला गावडे, अर्चना देसाई, गुरुनाथ राऊळ, संदीप गवस, मनोहर गवस इत्यादी उपस्थित होते. .
तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश पालव,सुरेंद्र विरनोडकर, नितीन सावंत, मंगेश देसाई, रोशन राऊत, बरागडे,संजय बांबुळकर, संतोष रावण, संदीप मेस्त्री, उदय सावळ,अमित टक्केकर, रवी गुरव, मिंगेल मान्येकर,बाबुराव पास्ते, श्रावणी सावंत, तेजस्विता वेंगुर्लेकर, नंदू कवठणकर, बापूशेठ कोरगावकर,बाबा गुरुजी,वंदना सावंत, सरस्वती गावडे,प्रणिता भोयर, राधिका परब,मनाली कोरगावकर,वैष्णवी फाले, श्रेया परब,भाग्यश्री राणे, दिपाली नेहारकर तसेच तालुक्यातील सर्व महिला शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सेल सचिव रोशनी राऊत सूत्रसंचालन मनोहर परब, निता सावंत याने तर आभार दीपक राऊळ यांनी मानले.