
सिंधुदूर्ग: संपादकीय
दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५
संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली जाते. या आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासह आजार होऊ नये यासाठी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान काम करीत आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे यांनी केले.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सातेरी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ प्रशांत ससाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. रश्मी पुजार, डॉ. अखिलेश शुक्ला, डॉ. साईश गावस, डॉ. पूजा गावडे, डॉ. शमा सरमोकदम, डॉ गायत्री भोसले, डॉ आदित्य हतवार, परिचारिका मोहिनी परब, एमडी. कामरूझ सुमन, तेरवणचे सामाजिक कार्यकर्ते विजय गवस, संतोष गवस, सदाशिव गवस, उमेश गवस, सुहास गवस, नामदेव गवस, माजी सैनिक सचिन गवस, शंकर गवस आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. रश्मी पुजार, डॉ. अखिलेश शुक्ला, डॉ. साईश गावस, डॉ. पूजा गावडे, डॉ. शमा सरमोकदम, डॉ गायत्री भोसले, डॉ आदित्य हतवार यानी हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली. तसेच या शिबिरात काही रुग्णांची मधुमेह तपासणी करून उपचार करण्यात आले.
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात तेरवण, मेढेसह कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापुर, नामखोल, मीरवेल, पारगड या गावातील २१८ आबालवृद्धांनी लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या परिचारिका मोहिनी परब, एमडी. कामरूझ सुमन, विद्यार्थी रीया बागळी, पूर्वा गवस, सानिका शेटये, संजना गावडे, श्रीकांत वर्मा, फार्मासिस्ट सुमित हळदणकर, समीर पावणे, संकेत मांद्रेकर, जयवंत राऊळ या कर्मचारी वर्गाचेही सहकार्य लाभले. या शिबिराचे तेरवण ग्रामस्थ मंडळाच्या रोहन सावंत, मोहन सावंत, रमेश सावंत, तुकाराम गवस, गोपाल गवस, ऋतुजा सावंत, मंगल गवस, मंगल शंकर गवस, संतोष गवस आदी सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
