आताच शेअर करा
फोटो – ( बांदा उभा बाजार येथे श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वासराचा पंचनामा करताना वनविभागाचे अधिकारी सरपंच व अन्य)

दिनांक: १७ फेब्रुवारी २०२५

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर

सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात उभा बाजार येथे भर वस्तीत घरामागे असलेल्या गोठ्यात शिरून एका जंगली श्वापदाने गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडण्याची धक्कादायक घटना आज घडली. बांदा उभाबाजार येथील राजेश पावसकर हे गेली कित्येक वर्षे  गोपालन करतात. त्यांच्या गोठ्यात गाय आणि वासरू बांधलेले होते. आज सकाळी ते गोठ्यात गेले असता रक्तबंबाळ वासरू मृता वस्तीत पाहून त्यांना धक्काच बसला. गोठ्यात रक्ताचा सडा पसरला होता आणि वासराचे जागोजागी लचके तोडण्यात आले होते .घटनेची खबर मिळतात बांदा सरपंच प्रियांका नाईक,बांदा परिमंडळ वन अधिकारी प्रमोद सावंत, वनरक्षक वैभव हितापे,पोलीस पाटील राजन गवस , सामाजिक कार्यकर्ते शैलेश केसरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
ज्या पद्धतीने वासराचे लचके तोडलेले आहेत त्यावरून हेच श्वापद वाघाटी किंवा बिबटा असू शकते. इतक्या वर्षात बांदा शहरात नागरी वस्ती भागात प्रथमच अशी घटना घडली आहे .त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागात जंगली श्वापदाच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो – ( बांदा उभा बाजार येथे श्वापदाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वासराचा पंचनामा करताना वनविभागाचे अधिकारी सरपंच व अन्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *