
बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर
दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५
” Bagless saturday “या उपक्रमाअंतर्गत शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माध्यमिक विद्यालय, डेगवे या प्रशालेमध्ये रामकृष्ण मठ, फोंडा गोवा चे स्वामी आर्यानंद यांनी प्रशालेतील इयत्ता सातवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक ध्येये तसेच जीवनाची दिशा ठरविण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे मौलिक विचार कसे उपयोगी आहेत याचे उदाहरणे देऊन अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या प्रसंगी शालेय समिती सदस्य आदरणीय भरत देसाई सर तसेच महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान कमिटीचे आदरणीय मधुकर देसाई, रामा देसाई, वीरेंद्र देसाई, दादा देसाई उपस्थित होते. प्रशालेतर्फे सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
