
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: १६ फेब्रुवारी २०२५
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व, पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
वक्तृत्व स्पर्धा – दुसरी ते चौथी गट- प्रथम- सार्थक राणे (जिल्हा परिषद इन्सुली नं. १०), द्वितीय- सर्वज्ञ वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १), तृतीय- दक्ष वालावलकर (सुधाताई कामत शाळा नं. २ सावंतवाडी).
पाचवी ते सातवी गट, प्रथम- मैथिली सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), द्वितीय- प्रणिता सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), तृतीय- श्रुतिका राजगोळकर (जिल्हा परिषद इन्सुली नं. ५). आठवी ते दहावी गट, प्रथम- मिताली कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली), द्वितीय- शमिका आरावंदेकर (कुडाळ हायस्कूल, कुडाळ).
पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धा- इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरी गट- प्रथम- सार्थक वालावलकर, द्वितीय- वेदांत वीर, तृतीय- ईश्वरी गवस. इयत्ता चौथी ते इयत्ता सहावी गट- प्रथम- सर्वज्ञ वराडकर, द्वितीय- आर्या ठाकर, तृतीय- दुर्वा नाटेकर. इयत्ता सातवी ते इयत्ता दहावी गट – प्रथम- वासंती धुरी, द्वितीय : नैतिक मोरजकर, तृतीय- सीमा गवस. विजेत्यांना १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती सोहळ्यात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, परीक्षक प्रकाश तेंडोलकर, प्रा. वैभव खानोलकर, हेमंत गवस, सौ. शुभेच्छा सावंत, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती नाईक म्हणाल्या की, वक्तृत्व शैलीतून विदयार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. उत्कृष्ट वक्ता हा जगाच्या पाठीवर कुठेही टिकाव धरू शकतो. शालेय जीवनातच वक्तृत्व शैली विकसित करण्यासाठी श्री स्वराज्य प्रतिष्ठान सातत्याने वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करत असते हे कौतुकास्पद आहे. अशा स्पर्धाचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी बांदेकर व सौ. रीना मोरजकर यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष केदार कणबर्गी, जे. डी. पाटील, संकेत वेंगुर्लेकर, शुभम बांदेकर, नारायण बांदेकर, समीर परब, अनुप बांदेकर, ओंकार हळदणकर, राज येडवे, शौनक वाळके, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते.