
बांदा प्रतिनिधी : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक २६ मे २०२४
श्रीदेवी माऊली रवळनाथ वार्षिक वर्धापन दिनानिमित्त कास येथे गोवा फ्रेंड सर्कल आणि कास ग्रामस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ७: ०० वाजता अभिषेक, सकाळी १०:०० वाजता लघुरुद्र आरती आणि महाप्रसाद, सायंकाळी ७:०० वाजता ग्रामस्थांचे भजन आणि रात्रौ ९:०० वाजता रेकॉर्ड डान्स खुली स्पर्धा मंगळवार दिनांक २८ मे रोजी ७:०० वाजता अभिषेक, सकाळी ११: ०० लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, सायंकाळीं ७: ०० वाजता ग्रामस्थांचे भजन आणि रात्रौ ठीक ९: ०० वाजता श्री स्थापेश्वर कला क्रीडा मंडळ डेगवे प्रस्तुत हृदयस्पर्शी सामाजिक नाटक “अश्रूंची झाली फुले ” बुधवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ७:०० वाजता अभिषेक, सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा सकाळी, ११: ०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसाद आणि महाप्रसाद, सायंकाळीं ७: ०० वाजता वास्को गोवा येथील भजनी कलाकारांचे सुस्वर भजन, रात्री ९:०० वाजता सर्व स्पर्धकांचे पारितोषिक वितरण समारंभ आणि ठीक रात्रौ ११:०० वाजता चेदवणकर दशावतार नाटय मंडळ चेदवण यांचा ट्रेकसिनयुक्त दशावतारी नाटक” ब्रम्ह पदार्थ” अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे गोवा फ्रेंड सर्कल आणि कास ग्रामस्थ यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

