सावंतवाडी प्रतिनिधि
दिनांक: १९ डिसेंबर २०२४
सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे कलंबिस्त गावातील श्री देव लिंगेश्वर मंदिर, वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.आज सकाळी ९.०० वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे.नंतर नवस बोलणे आणि नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत.रात्रौ १२.०० वाजता पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम आणि त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा दणदणीत असा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तरीही सर्व भाविकांनी नाट्यरसिकांनी या सुसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे कलंबिस्त ग्रामस्थांच्या वतीने आवाहन.