बांदा प्रतिनिधी/ अक्षय मयेकर
दिनांक:१९ डिसेंबर २०२४
बुधवार दि.१८ रोजी माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत सकाळी १० वाजता प्रशाले तील विविध स्पर्धामध्ये यशस्वी तसेच गुणवान विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रके देऊन गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डेगवे गावचे सरपंच मा. राजन देसाई, प्रमुख पाहुणे मा. सुभाष बोन्द्रे ( समन्वय समिती सदस्य धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई) मा. प्रवीण देसाई ( चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी डेगवे) श्री नंदकुमार नाईक सर (सहसचिव समन्वय समिती धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ),माजी विद्यार्थिनी कुमारी साक्षी दादा देसाई, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल देसाई तसेच महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सिताराम देसाई, मधुकर देसाई, उत्तम देसाई, विश्वनाथ देसाई इत्यादी पदाधिकारी तसेच सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रेमानंद देसाई, प्रेमलता देसाई, पोलीस पाटील गजानन देसाई, डेगवे ग्रामपंचायत सदस्य, आडाळी , मोरगाव, डिंगणे धनगरवाडी, पडवे माजगाव तसेच डेगवे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. सुभाष बोंद्रे यांनी तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सीताराम देसाई यांनी प्रत्येकी रुपये ५००० एवढी बहुमोल देणगी शाळेला प्रदान केली. ” कोकणी गोडवा ” या उद्योग समूहाचे श्री भीमसेन देसाई यांनी क्रीडा स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना या उद्योग समूहातर्फे पुरस्कृत विशेष मेडल्स प्रदान केली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.के. सावंत सर यांनी केले. संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या कार्यक्रमाचे अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम.जे एस राठोड मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए. एच. मगदूम सर, श्रीम.यशदा देसाई मॅडम, श्रीम पी.पी. देसाई मॅडम यांनी केले.