तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे
दिनांक: १९ डिसेंबर २०२४
आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळा नंबर. 1 मधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.मोठा गट मुलगे रिले विजेता
लहान गट रिले मुलगे उपविजेता
आयुष जाधव :उंच उडी प्रथम क्रमांक
अनुष्का रेडकर :गोळा फेक प्रथम
सोहम गावडे :गोळाफेक प्रथम
उदय गावडे :१००मी धावणे प्रथम
निखिल गावडे :२०० मी धावणे
द्वितीय
सोहम गावडे :लांब उडी द्वितीय मुख्याध्यापक माननीय श्री. विलास नाईक व त्यांचे इतर शिक्षक सहकारी यांनी मुलांना खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना यश आलय व सर्व यशवंत विद्यार्थी यांनी पण हे मोठं यश गाठून स्वतःला सिद्ध करून दाखवलं व एक वेगळं यशाच किरण लोकांच्या नजरेत टाकलं विद्यार्थी एवढ्यावरच थांबणार नाहीत तर यापेक्षाही त्यांना उत्तुंग यश गाठायचं आहे व विद्यार्थांच नाव तसेच शाळेचं त्याच बरोबर आपल्या गावाचं नाव नक्कीच उच्च स्तरावर नेवून ठेवतील यात काहीच शंका नाही. आज प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले उद्या तालुका स्तरावर पण नक्कीच पुढे जातील. ही स्पर्धा सोनुर्ली हायस्कूल मध्ये पार पडली पडली. माननीय मुख्याध्यापक श्री. विलास नाईक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.