मालवण प्रतिनिधि
दिनांक: १६ डिसेंबर २०२४
मालवण तालुक्यातील चिंदर गावातील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सावानिमित्त चिंदर सेवा संघ, चिंदर आयोजित ‘ संदीप भाई पारकर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीर कार्यक्रमातून लोकांची सेवा व्हावी व एखाद्या गरजूला जेव्हा जेव्हा खरीच रक्ताची गरज असते तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला रक्त देता यावं व त्यातून त्याचे प्राण वाचतील हीच प्रामाणिक भावना या चिंदर सेवा संघाची आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जात.
आज रक्तदान शिबीर चालू असून रक्तदात्यांचा उत्स्पूर्थ प्रतिसाद मिळत आहे. हा रक्तदान कार्यक्रम श्री भगवती मंगल कार्यालय, चिंदर भटवाडी येथे सकाळी 9.30 ते 1. 00 या वेळेत आयोजीत करण्यात आले होते. तरी या कार्यक्रमास गावातील सर्व मंडळींनी उपस्थित दाखऊन सहकार्य केल्याबद्दल रक्त दात्याचे खूप खूप आभार असे आवाहन चिंदर सेवा संघ, यांजकडून करण्यात आलेले आहे.