तळवणे प्रतिनिधि: राहुल गावडे
दिनांक: १५ डिसेंबर २०२४
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा-मूठवाडी येथील देविदास भिकाजी देवजी (वय ६२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा भिकाजी व स्नेहांत, दोन मुली, जावई, सून, दोन भाऊ, बहिण, नातवंडे असा परिवार आहे. गोवा येथे कार्यरत असलेले पत्रकार प्रसन्न कोचरेकर यांचे ते सासरे होत.