सिंधुदूर्ग / संपादकीय
दिनांक :४ डिसेंबर २०२४
आंतरराष्ट्रीय कीर्तचे नाटककार लेखक कवी समीक्षक सावंतवाडीचे सुपुत्र अनिल जिजाबाई कांबळे यांचे बहुचर्चित आणि साहित्य व बौध्दिक वर्तुळात उत्सुकता असलेले Enemy Of America हे fiction व non fiction चे मिश्रण असलेले पुस्तक अगदी काही काळातच थेट अमेरिकेत प्रकाशित होत आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी न्यूयॉर्क येथील प्रकाशक ॲंथनी मॉरिस यांनी स्विकारली असुन अमेरिकन निवडणुकांच्या काळातच या आगामी पुस्तकाची चर्चा तेथील बौध्दिक वर्तुळात सुरु झाली आहे.
अमेरिकन निरंकुश भांडवलशाही, समाज साहित्य व मानसिकतेची प्रखर समीक्षा करणारे हे पुस्तक आहे.
अमेरिकन निवडणूक काळात अमेरिकेतच हे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस प्रकाशक ॲंथनी मॉरिस व लेखक अनिल कांबळे करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक वअभिनंदनही होत आहे.
गेल्या चार वर्षांच्या कालावधीत अनिल कांबळे यांचे प्रकाशित होणारे हे चौथे इंग्रजी पुस्तक आहे. The fox, Its Already Tomortow, Death of Arts नंतर प्रकाशित होणारे Enemy Of America हे अनिल यांचे चौथे पुस्तक असुन त्यांची ही साहित्य क्षेत्रातील यशाची घौडदौड चढत्या क्रमाने सुरु आहे.
Enemy of America या पुस्तकात अनिल कांबळे यांनी लेखनात वेगळी प्रायोगिकता योजली असुन fiction व non fiction चा एकत्र प्रयोग त्यांनी या लेखनात केला असुन अमेरिकन प्रकाशकांना पहिल्याच प्रयत्नात या लेखन शैलीने प्रभावित केले असुन या वेगळ्या लेखनाची व पुस्तकाचे नाव याबद्दल लागलेली उत्सुकता संबंधीत क्षेत्रातील जाणकार व वाचकांमध्ये वाढली आहे.
अमेरिकेच्या हिंसक बाजूची चर्चा करतांना अमेरिकेचे सामर्थ्य आणि उद्याचा जागतिक मानवी समाज इत्यादींची चर्चा अनिल यांनी या लेखनात करताना त्यांनी कुठल्याही विचारसरणीची झापडे न घेता खुलेपणाने विवेचन केले असल्याचे प्रकाशक ॲंथनी मॉरिस म्हणाले आहेत.
सावंतवाडीसारख्या मुख्य धारेपासुन दुर असलेल्या गावातुन आलेले डॉ. अनिल जिजाबाई कांबळे यांचा इथवरचा struggle अत्यंत थरारक नाट्यमय व वेदनामय असा आहे. गेली दोन दशके त्यांनी मराठीत सातत्याने कविता दीर्घकविता कादंबरी नाटक वैचारीक समीक्षा लेखन केले परंतु संकुचित मराठी साहित्य व दलित साहित्य वर्तुळाने त्यांच्याबाबत नेहमीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले उपेक्षा केली मात्र इंग्रजी लेखनानंतर संपूर्ण जगाचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतले आहे.
इंग्रजी लेखनात त्यांचे नाव आज जगभर होत असतांनाच त्यांचे परदेशात प्रकाशित होणारे Enemy of America हे पहिलेच पुस्तक असुन महासत्ता असलेल्या अमेरिकेत पुस्तक प्रकाशित होण्याचा मान त्यांना लाभत असल्याने त्यांच्या कीर्तीमध्ये अजुन भर पडत आहे.
या संदर्भात अनिल यांच्याशी कोकण व्हिजन न्यूजच्या संपादकांनी संपर्क केल्यावर ते म्हणाले “अमेरिकेत माझे पुस्तक प्रकाशित होत आहे हे एक प्रकारचे साहस आहेच एक थ्रिल सुध्दा आहे माझ्यासाठी…
खरे तर या पुस्तकाचे नाव Enemy America असे आधी ठरले होते परंतु काही कारणास्तव पुस्तकाचे नाव बदलावे लागले त्या मागचा किस्सा खुपच रंजक आहे तो मी शेअर करेन कधीतरी.. पुस्तक प्रकाशन होत असताना मीही अमेरिकेत असावे असे प्रकाशकांचे मत आणि आग्रह आहेत मात्र तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या योग्य वेळी तर मीही या महत्वाच्या प्रसंगी अमेरिकेत उपस्थित राहीन ‘