आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर 

दि.६ मे २०२४

अहमदनगर हुन गोवा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या खाजगी बस आणि मालवाहू ट्रकमध्ये इन्सुली कोठावळेबांध येथे अपघात झाला. इन्सुली पंजाबी धाब्यासमोर अनधिकृतपणे फोडलेल्या दुभाजकातुन ट्रक घातल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले. सदरचा अपघात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. या बाबतची कोणतीच नोंद बांदा पोलिसात नसल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.
    या बाबत मिळालेली माहिती अशी की,  अहमदनगर येथून गोवा येथे पर्यटनासाठी खाजगी बस जात होती. दरम्यान गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पंजाबी धाब्यासमोर अनधिकृत पणे फोडलेल्या दुभाजकातुन गाडी घातली मात्र गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला एक्सप्रेस हायवे असल्याने त्या ट्रकला येऊन खाजगी बस धडकली ही धडक एवढी मोठी होती की यात बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. याबाबत ची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व यातील जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मोठ्या प्रमाणात हायवेवर ट्राफिक जाम झाले होते.
    यावेळी बांदा पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत याबाबतीत कोणतीच नोंद बांदा पोलिसात नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *