बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर
दिनांक: ३१ ऑक्टोंबर २०२४
बांदा येथील काळसेवाडी, सुतारवाडी बॉइज या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडळाने बांदा शहरात भव्य दिव्य नरकासुर प्रतिमा ऊभी केली होती. दरवर्षी प्रमाणे हया ही वर्षी स्पर्धेत भाग घेऊन नरकासुराची भव्य आकर्षणीय प्रतिमा ऊभी केली. हया मंडळाने एक जुटिने कोणतीही कसूर न सोडता हा देखावा साकारण्याचा प्रयत्न केला.नरकासुर बनवण्यात हातखंड आसलेल्या या मंडळाने यावर्षी सुद्धा नरकासुराची भली मोठी तेजोमय रेखीव प्रतिमा साकारली..विशेष म्हणजे नरकासुर वध हा हलता देखावा सादर करण्यात आला होता. सिंधुदुर्ग मर्यादित स्पर्धेत या मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. संपूर्ण बांदा पंचक्रोशी मध्ये या नरकासुर व एस के बॉइज मंडळाचे कौतुक होत आहे.