आताच शेअर करा

सिंधुदुर्ग /संपादकीय

दिनांक :२८ सप्टेंबर २०२४


पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत असलेले मडुरा-बाबरवाडी येथील नाईक कुटुंब बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या अर्ध्याअधिक भिंतीत ओलावा निर्माण झाला असून घर केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी घरात वास्तव्य करायचे की नाही असा प्रश्न नाईक कुटुंबियांना पडला आहे.
मडुरा-बाबरवाडी येथील सावळाराम लक्ष्मण नाईक यांचे घर मातीचे आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे घराच्या भिंती पूर्णपणे कमकुवत झाल्या असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सावळाराम यांची आर्थिक परिस्थितीत हलाखीची आहे. त्यांचे घर पंतप्रधान आवास योजनेच्या ‘ड’ यादीत 30 क्रमांकावर आहे. जोपर्यंत अगोदरची यादी पूर्ण होत नाही तोपर्यंत नाईक यांना प्रतिक्षा करत जीव मुठीत धरून रहावे लागत आहे.
पंतप्रधान आवास योजनेची ‘ड’ यादी उशिरा येते.  गावातील घरे मातीची असतात. त्यामुळे मातीच्या घरांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. मडुरा येथे मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यामुळे घरात ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे घर केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यादी पूर्ण झाल्यानंतर नाईक यांना लाभ मिळणार, मात्र तोपर्यंत दुर्घटना झाल्यास घरात राहणाऱ्या तीन व्यक्तींच्या जीवास धोका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *