बांदा प्रतिनिधी :संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:२३ सप्टेंबर २०२४
बांदा येथील ” अ ” वर्गातील शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ३. ३० वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात करण्यात आले आहे.
या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०२३-२४ च्या जमाखर्चास मान्यता देणे, वार्षिक अहवाल मंजूर करणे, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषय होणार आहेत.
वाचनालयाच्या सभासदांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष एस आर सावंत, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर यांनी कार्यकारी मंडळाच्या वतीने केले आहे.