बांदा/ प्रतिनिधी
दिनांक: २३ सप्टेंबर २०२४
तुळसुली येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून सलग दुसऱ्या वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. १७ वर्षे वयोगटातील मुलगे व मुली दोन्ही संघ उपविजेते ठरले. या विजयामुळे सर्व खेळाडू, क्रीडाशिक्षक महेश नाईक व मुख्याध्यापिक सायली परब यांचे कौतुक होत आहे.
मुलींच्या संघामध्ये अलिषा गावडे, आर्या गवस, उर्वशी शेर्लेकर, क्लेरिसा रोडरिक्स, चैत्रा नाईक, तपस्या धुरी, दृष्टी सातार्डेकर, पलक गावडे, प्रियांका तूयेकर, सानिका गावडे, स्नेहा केरकर, हर्षदा नाईक, निधी किडजी, श्रेया गावडे तर मुलांच्या संघांमध्ये चिन्मय नाईक, कृष्णा गावडे, गोविंद राणे, महादेव सावंत, यथार्थ पंडित, यशदीप गावडे, रमेश परब, रोहित केणी, लक्ष सामंत, विश्राम परब, सोहंम पाडलोस्कर, सहदेव पडलोसकर,वेदांत गावडे या सर्व विजयी खेळाडूनी न्यू इंग्लिश स्कुल मडुराचे नावलौकिक वाढवले आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारीनी सदस्य, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.