सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर
दिनांक: ११ सप्टेंबर २०२४
एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन शंभूराजांच्या समाधीच्या अग्र पूजेचा मान मिळवणे त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सामाजिक कर्तुत्वाच्या जोरावर असंख्य पुरस्कार मिळवणे ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रातील खळणेवाडी या दुर्गम गावातील भाचे तसेच गोव्यातील सत्तरी तालुक्यातील सुपुत्र अँड शिवाजी देसाई यांनी ही किमया साध्य करून दाखविली आहे आणि त्याचा खळणेवाडी गावच्या सावंत भोसले या छत्रपती शिवरायांच्या वंशज असलेल्या घराण्याला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन जयानंद सावंत भोसले यांनी सावंतवाडी तालुक्यातील खळणेवाडी सांगेली या गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अँड शिवाजी देसाई यांच्या गौरव कार्यक्रमात बोलताना केले. याप्रसंगी गौरव मूर्ती अँड शिवाजी देसाई, त्यांच्या पत्नी सौ. प्रियदर्शिनी देसाई, सौ. मनीषा देसाई, सुहास सावंत भोसले, कीर्ती राज सावंत भोसले, घनश्याम सावंत भोसले, विद्याधर सावंत भोसले, सुवेश सावंत भोसले, आनंद सावंत भोसले, गजानन सावंत भोसले, बाजीराव सावंत भोसले, मनोहर सावंत भोसले, संतोष सावंत भोसले, संदीप सावंत भोसले, भगवान सावंत भोसले, दीपक सावंत भोसले, प्रमोद सावंत भोसले, विनायक सावंत भोसले, महादेव सावंत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
जयानंद सावंत भोसले पुढे म्हणाले की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे नाते देखील सावंत भोसले घराण्याची आहे. आणि त्यांच्या हस्ते देखील अँड शिवाजी देसाई यांचा गौरव झालेला आहे. याचा आम्हाला गर्व आहे. सुहास सावंत म्हणाले की अँड शिवाजी देसाई यांनी सातत्याने आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना येणाऱ्या कालावधीत अनेक पुरस्कार मिळतील. परंतु त्याचबरोबर ते आपल्या मामाच्या गावाला कधीच विसरले नाहीत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या गौरवाला उत्तर देताना अँड शिवाजी देसाई म्हणाले की ध्यानीमनी नसताना मामाच्या गावामध्ये सर्व मामानी एकत्र येऊन आपला गौरव केला याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. आता आपल्याला खळणेवाडी गावातून व्यसनमुक्ती चळवळ हाती घ्यायला हवी. या गावाने मला भरभरून प्रेम आणि आपुलकी दिली आहे. याचा मी कायम ऋणी राहीन.यावेळी सौ. प्रियदर्शिनी देसाई म्हणाल्या की अँड देसाई नेहमीच आपल्या मामाच्या गावाची आठवण काढतात . त्यांना आपल्या मामाच्या गावाची अगदी बालपणापासून प्रचंड आवड. ती आवड त्यांनी आणि आजही कायम ठेवली आहे. यावेळी खळणेवाडी गावच्या पारंपारिक पद्धतीने सुहास सावंत यांनी शिवाजी देसाई यांचा गौरव केला.