
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:२४ ऑगस्ट २०२४
जगातील प्रसिद्ध जादूगार आपल्या शोमध्ये जे विविध जादूचे प्रयोग दाखवतात ते कोणताही चमत्कार किंवा जादूटोणा नसून केवळ विज्ञान व हातचलाखी वर आधारित असतात.
आज शनिवार दि. २४/८ /२०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत” Bagless saturday ” या अंतर्गत विज्ञान व जादूचे प्रयोग यासंबंधीचा पाऊण तासाचा शो विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. बांदा येथील स्थानिक कलाकार श्री रामेश्वर पारकर त्यांचे चिरंजीव जादूगार वैभव यांनी या शोमध्ये विविध जादूचे प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर करून त्यानंतर त्यामागे कोणताही चमत्कार नसून विज्ञान व हात चलाखी आहे हे दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी काही प्रयोगामध्ये सहभागी होऊन या शो ची रंगत वाढवली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. के. सावंत सर यांनी या कलाकारांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. जादूगार वैभव हे आपल्या ओटवणे गावाचे असून बांद्यातील रहिवासी आहेत. आपल्या कोकणातील कलाकारांनी अश्या विविध क्षेत्रामध्ये पुढे येऊन आपले नाव कमावले पाहिजे तसेच सर्व जादूच्या प्रयोगामध्ये विज्ञान व हातचलाखी असते असे सावंत सरानी प्रतिपादन केले.
