बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
ता:१७ एप्रिल २०२४
देशात प्रभू रामचंद्रांचे भक्तिमय वातावरण असताना नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर बऱ्याच भाविकांची अलोट गर्दी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येत असून प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावे असे देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात भावना जागृत झाले आहे. जन्म आणि मरण या आयुष्याच्या भोवऱ्यात आपली यात्रा चालू असताना एकदा तरी प्रभू रामचंद्राचे दर्शन व्हावं असं प्रत्येक हिंदू धर्मियांना वाटत असते.
अशाच एका रामभक्ताने मडूरा गावचे सुपुत्र श्री. सुरेश परब राहणार देऊळवाडी यांनी प्रथमच अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले ते म्हणाले जन्माला आल्यावर या जन्म आणि मरणाच्या भोवऱ्यात आपली परिक्रमा चालू असताना आयुष्यात एकदा तरी प्रभू रामचंद्रांचे अयोध्येत जाऊन दर्शन घेतले पाहिजे. ते मला मडूरा दशक्रोशीतून प्रथम दर्शन राम लल्ला चे घेता आले. हे माझे भाग्य समजतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि दशक्रोशीतील तमाम नागरिकांना प्रभू रामचंद्राचे अयोध्येत जाऊन दर्शन घ्यावे. अशी विनंती केली.