बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ५ ऑगस्ट २०२४
बांदा ग्रामपंचायत हि फक्त लोकांच्या समस्यांवर दुर्लक्ष करत आहे. बांदा शहरात सध्या अनेक समस्या आहेत. मग ते गटार असो, रस्ता असो,पाणी प्रश्न असो किंवा इतर अनेक समस्या असो बांदा ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष आहे. फक्त विकास कामाची घोषणा करतात पण नक्की विकास लोकांचा करतात की ठेकेदारांच्या करतात??? आता साई काणेकर यांनी मच्छी मार्केट संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्या नंतर सरपंचांना जाग आली आणि आता तुम्ही सांगत आहात की मच्छी मार्केट उद्घाटन होणार माहित असून साई काणेकर श्रेय घेण्याचे नाटक करतात..मग मागील 5 वर्ष बांदा ग्राम पंचायत काय करत होती?? सरपंचाच्या मते साई काणेकर बालबुद्धी आहेत मग तुम्ही गावातील समस्या आणि विकास कामे करून तुमची सर्वन्यान बुध्दी सिद्ध करावी.. गावातील सर्व लोकांना माहीत आहे बांदा गावात कोण कोण आपली बाजू वाचवत आहे ते.. त्यामुळे नागरिकांना तुम्ही मूर्ख बनवायचे काम आता तरी बंद करा.