सिंधुदूर्ग : संपादकीय
दिनांक: ३१ जुलै २०२४
निगुडे गावातील गेले कित्येक दिवस महावितरणाची विद्युत कामे प्रलंबित आहेत. पत्रव्यवहार करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. निगुडे गावात विद्युत वितरण कंपनी बाबत अनेक तक्रारी असून सदर समस्यांचे निवारण लवकर करावे. महावितरणाच्या बाबतीत गावात अनेक समस्या उद्भवत आहेत ते खालील प्रमाणे असून त्यावर लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.
१) निगुडे गावात कायमस्वरूपी वायरमेनची नेमणूक करावी.
२) निगुडे गावातील ट्रांसफार्मर जवळ बसविण्यात आलेली डी पी ही हलक्या दर्जाची असून वारंवार जळत आहे ती त्वरित बदलून द्यावी.
३) गावातून जाणाऱ्या विद्युत तारा ह्या पुष्कळ वर्षाच्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. ह्या तारा कायम तुटून पडत असतात. त्या बदलून नवीन वाहिन्या घालाव्यात.
४) विद्युत वाहिन्यावर आलेली झाडे झुडपे वेळीस तोडून साफसफाई करण्यात यावी.
५) बऱ्याच ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असून झाडे तारा एकमेकांना चिकटून विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यांना ताण देऊन गार्डिंग करण्यात यावे.
६) विद्युत स्विच हे कमी दर्जाचे तारा वापरलेले असून ते नेहमी जळून विद्युत खंडित होत असते. तसेच काही ठिकाणी डायरेक्ट कनेक्शन केलेले आहे. तरी सदर ठिकाणी नवीन स्विच खालून पूर्ववत करण्यात यावे.
७) विद्युत लाईन वर मारण्यात आलेल्या जंप हे हलक्या व जुना तारांचे असल्याने ते नेहमीच तुटून पडत असतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असतो ते सुस्थितीत करण्यात यावे.
८) काही ग्राहकांचे मीटर बंद आहेत ते त्वरित बदलून द्यावेत.
९) गावातील बऱ्याच ठिकाणी विद्युत खांब बदलण्याची गरज आहे ते बदलून द्यावेत.
या सर्व बाबींवर महावितरणाचे विभागीय उप अभियंता श्री. यादव साहेब यांना कित्येक वेळा निवेदने सादर करण्यात आली. तसेच वेळोवेळी फोन करून या संदर्भात माहिती देण्यात आली. तरी पण त्यांनी या सर्व गोष्टीवर दुर्लक्ष केला आहे. परिणामी वायरमन श्री.कुडव हे मरता मरता वाचले अजूनही लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या व बंद वाहिन्यांना शॉक येत आहे. विद्युत पुरवठा कमी जास्त होणे सुरूच आहे. असे अनेक प्रश्न महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे आज गावात अनेक समस्या उद्भवत आहे.तरी या सर्व मागण्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. असे निवेदन महावितरण सावंतवाडी उपविभागीय कार्यालय यांना देण्यात आले आहे. लवकर तोडगा न निघाल्यास येत्या १५ ऑगस्ट ला गावातील नागरिकांसह निगुडे ग्रामपंचायत कार्यालया समोर सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर उपोषणाला बसणार आहेत.