आताच शेअर करा

दिनांक: ०७/१०/२०२६

बांदा: श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्यातून माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शालेय क्रीडा गणवेशांचे वाटप अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडले.
गणवेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या क्रीडा गणवेश वाटप सोहळ्याप्रसंगी अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते:
आदरणीय श्री पी. एन. तेली सर (संस्थापक, स्थापेश्वर विद्या विकास मंच)
मा. श्री राजन देसाई (सरपंच, डेगवे गाव)
श्री मधुकर देसाई(माजी सरपंच बांदा मंडळ अध्यक्ष )
श्री प्रवीण देसाई(चेअरमन, डेगवे सोसायटी)
श्री दत्तात्रय देसाई(उपाध्यक्ष, पालक-शिक्षक संघ)
श्री गणपत देसाई (कार्यकारिणी सदस्य, पालक-शिक्षक संघ)
श्री भिमसेन (पप्पू )देसाई(कार्यकारिणी सदस्य, पालक-शिक्षक संघ)
श्री रामचंद्र शिंदे(कार्यकारिणी सदस्य, पालक-शिक्षक संघ)
कार्यक्रम सूत्रसंचालन व प्रास्ताविक:
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. के. सावंत यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए. एच. मगदूम यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत पार पाडले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा आणि अभ्यासाच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शालेय प्रशासनाकडून स्थापेश्वर विद्या विकास मंच, सर्व मान्यवर आणि पालक वर्गाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *