आताच शेअर करा

दिनांक: ०८/०९/२०२६

माणगाव: बँक ऑफ इंडिया, माणगाव शाखा  येथे बँकेचा 121 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे वरिष्ठ प्रबंधक *श्री. लक्ष्मण बोधवड* हे होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, 1906 साली स्वदेशी चळवळीतून स्थापन झालेली बँक ऑफ इंडिया आज 5100 हून अधिक शाखांसह जागतिक स्तरावर पोहोचली आहे. ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल आहे.

यावेळी शाखेच्या प्रबंधक (प्रशासन) नूतन ठाकूर मॅडम*, क्रेडिट मॅनेजर * अंजू मॅडम*, कॅशियर *श्री. महादेव शिरवळकर*, लिपिक *श्री. आकाश लकडे* व *श्री. कौस्तुभ बोबडे* उपस्थित होते.

कार्यक्रमात शाखेतील ज्येष्ठ ग्राहक, महिला बचत गट, शेतकरी व व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बँकेच्या विविध योजना – जनधन, किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा, डिजिटल बँकिंग (BOI Mobile App) यांची माहिती देण्यात आली.

ग्राहकांनी बँक ऑफ इंडिया ही सुरक्षित व हक्काची सरकारी बँक असल्याची भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन ठाकूर मॅडम यांनी केले तर आभार श्री. कौस्तुभ बोबडे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *