दिनांक: ०७/०९/२०२६

आरोस : आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस व शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आरोस बाजार येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. श्री. सच्चिदानंद जगन्नाथ परब ऊर्फ संजू परब यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. श्री. किशोरजी अशोक पाटकर यांच्या सौजन्याने तसेच शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख मा. श्री. महेश परब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला हातभार लावण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक श्री विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू मुळीक, शंकर नाईक, बाळा परब श्री. अशोक आंगचेकर, श्री. महेश परब आरुष पंचक्रोशीतील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
