आताच शेअर करा

दिनांक: ०५/०९/२०२६

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

तळवणे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळण्याच्या व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तळवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर  (स्कूल बॅग) आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हे शैक्षणिक साहित्याचे वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्या विशेष सहकार्यातून व प्रायोजकत्वातून करण्यात आले.

     शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यानंतर नवीन दप्तर आणि वह्या मिळाल्यामुळे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला तसेच शाळेला आवश्यक असलेला  प्रिंटर लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक माननीय गोसावी सर, कोरगावकर सर तसेच नाटेकर मॅडम यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. तसेच कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाटये , प्रवीण गावडे, हर्षद रेडकर, आशिष नाईक, बबन गावडे, रघुवीर गावडे, बाबू गावडे, तुषार पेडणेकर, निलेश रेडकर, रुपेश रेडकर, महेश जाधव, अमरेश गावडे, भाऊ गावडे, प्रसाद नाईक, प्रदीप गावडे, सुशांत गावडे, वेदांत गावडे, राहुल गावडे, दीपक गावडे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या वतीने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचे विशेष आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed