आताच शेअर करा

दिनांक: ०४/०९/२०२६

तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

तळवणे:तळवणे गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण कृष्ण सप्तमी, दिनांक ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे.

      हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, आजूबाजूचा परिसर भक्तिमय वातावरणाच्या असमंतात दरवळून निघाला आहे. आज पूर्ण रात्रभर गावातील सर्व भजन मंडळाची भजने होणार आहेत. उद्या दुपारनंतर फळांचा तसेच नारळ, तांदूळ, खण, अशाप्रकारच्या छोट्या – मोठ्या वस्तूंचा लिलाव होणार आहे.

     दशक्रोशीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे  गावातील ग्रामस्थानकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *