
दिनांक: ३१/०८/२०२६
सावंतवाडी : गणपती उत्सव म्हटला की सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले जाते ते म्हणजे कोकणाकडे पण खास करून सिंधुदुर्गात गणेश उत्सवास लाखो भाविक उतरत असतात . सर्वांचा लक्ष चित्र शाळेकडे वेधलेला असतो. मूर्ती सुबक आणि सुंदर असावी असं प्रत्येक चाकरमान्यांचे मत असतं आणि हे मत जिंकून घेणारे म्हणजेच मूर्ती घडवणारे मूर्तिकार अशाच एका सुप्रसिद्ध मूर्तीकार विलास मांजरेकर यांना ‘कोकण कलारत्न पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल परब यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक गुरुदास मटकर उपस्थित होते.
