आताच शेअर करा

दिनांक: ३१/०८/२०२६

तळवणे प्रतिनिधी :शंकर गावडे

वेगुर्ला: वेंगुर्ला इनरव्हील क्लब तर्फे रक्षाबंधन निमित्त अनोखा उपक्रम उपक्रम राबवण्यात आला असून वेंगुर्ला पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना  त्यांच्या प्रति असलेलं प्रेम या रक्षाबंधन निमित्त व्यक्त करण्यास वाव मिळाला. सर्व कर्मचारी बांधवाना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

      अविरतपणे समाजासाठी सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवाना वेंगुर्ला येथील इनरव्हील क्लबने चांगल्या रीतीने प्रतिसाद देऊन त्यांच्या कामाची पोच पावती घेऊन हा नक्कीच चांगला उपक्रम पार पाडलाय .  वेंगुर्ला शहरातील असलेली एकजूट  यातून दिसून आली.
      
       या कार्यक्रमानिमित्त इनरव्हील क्लब चा अध्यक्षा  ज्योती देसाई, पोस्टमास्तर सौ. वाडेकर, ई. सी. मेंबर डॉ. पूजा कर्पे, आय. एस. ओ. गौरी मराठे, वैभवी दाभोलकर, रसिका मठकर,  आणि इतर पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed