आताच शेअर करा

दिनांक २३/०८/२०२६

कणकवली:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भारतशेठ गोगावले यांची निवड झाल्याबद्दल प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भरतशेठ गोगावले यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रायगडच्या विकासासाठी भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाचा निश्चितच फायदा होईल. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, विकासकामे आणि विविध सामाजिक उपक्रमांना त्यांच्या माध्यमातून अधिक गती मिळेल, असा विश्वास उद्योजक संदीप चौकेकर यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे काम करण्यासोबतच समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली घडेल, असा विश्वास उद्योजक संदीप चौकेकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *