
दिनांक: १७/०७/२०२६
तळवणे: शंकर गावडे
वेंगुर्ला:काल सायंकाळी अणसुर येथील युवक वेंगुर्ला समुद्रात बेपत्ता खाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अणसूर देऊळवाडा येथे राहणारा हा व्यक्ती वेंगुर्ला येथील लाईट हाऊस जवळील एका खडकावर बसून गरी ने मासेमारी करत असताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या धडकेमुळे हा युवक समुद्रात फेकला गेला. काही क्षणात तो पाण्यात बुडाल्यामुळे दिसेनासा झाला. पोलिसांनी लगेच शोध मोहीम हाती घेतली. अंधार असल्यामुळे शोध घेण्यात अडथळा येऊ लागला. काही वेळ बराच शोध घेतल्यानंतर त्यांना काही या युवकाचा पत्ता लागला नाही.
बऱ्याच शोधा नंतर शेवटी या युवकाची वेंगुर्ला पोलीस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली. आपल्या मित्रांसोबत तो वेंगुर्ला येथे मासेमारी करण्यासाठी आला होता.
