
दिनांक: १६/०७/२०२६
सावंतवाडी :
जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांचा मुलगा समर्थ याचे बुधवारी रात्री निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच कुडाठ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी गावडे यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
यावेळी त्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला. तसेच या कठीण प्रसंगात संपूर्ण कुटुंबाला मानसिक बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस हे देखील उपस्थित होते.
