आताच शेअर करा

दिनांक: ०५/०७/२०२६

सावंतवाडी: सातार्डा गावातील घोगळवाडी येथील असलेला श्री तपामुक्तीद्वार माठास स्थानिक नागरिक पंकज मेस्त्री आणि सुशांत मेस्त्री यांनी विरोध केला आहे. सर्वे नंबर १६९/४ मध्ये उभ्या असलेल्या मठाची इमारत ही बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे योग्य ती नोंदणी झालेली नसल्याची म्हटले आहे. त्यांच्या मते मठाच्या नावाखाली लोकांच्या धार्मिक भावनांचा वापर करून आर्थिक लाभ घेतला  जात आहे. असा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे या मठाची रीतसर चौकशी व्हावी असे   गटविकास अधिकारी सावंतवाडी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच ट्रस्ट स्थापन करण्या पूर्वी जमीन व मालमत्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी. ग्रामपंचायतीने सर्वे नंबर मधील संबंधित इसमास ट्रस्ट स्थापन करण्यास देऊ नये. असेही त्यांनी संबंधित अर्जात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासन , नगरविकास विभाग व शासन निर्णय टिपीएस  काही कलमांच्या आधाराखाली ही  परवानगी ग्रामपंचायतीला रोखता येते. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर ग्रामपंचायत रोख लावू शकते त्या नियमांचा वापर करून या प्रकरणी ग्रामपंचायतीने निर्णय घ्यावे असे संबंधित  विरोधकांनी सावंतवाडी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना अर्जाद्वारे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *