
दिनांक: २२/०४/२०२६
बांदा: उशिरा का होईना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व काजू उत्पादकांसाठी एक आशादायक बैठक झाली ज्यामध्ये सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ -सिंधुदुर्ग जिल्हा बँक -काजू बोर्ड व पणन मंडळ एकत्र येऊन काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृतिशील व गतिमान कार्यक्रम त्वरित आखून त्या दिशेने कारवाई करणार आहेत .सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन श्री मनीष दळवी सिंधुदुर्ग फळबागातदार संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत सह्याद्री काजू प्रकल्प व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर देसाई कळणे सरपंच श्री बॉबी उर्फ अजित देसाई यांची औपचारिक बैठक आज जिल्हा बँकेत झाली .जिल्हा बँकेचे चेअरमन तथा काजू बोर्डाचे तज्ञ संचालक श्री मनीष दळवी यांनी ही बैठक आयोजित केली होती .सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजूला उर्जितावस्था आणण्यासाठी अनेक शेतकरी संघटना आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे मात्र प्रत्येक तालुक्याच्या काजू बाबत वेगवेगळ्या समस्या असल्याने याबाबत एक वाक्यता नसल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समस्या समजण्या साठी त्याना एकत्र करून त्याचा आढावा घेऊन काजू बाबत एकच धोरण व रूपरेषा शासनासमोर मांडण्यासाठी ही बैठक श्री मनीष दळवी संचालक काजू बोर्ड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती .या संदर्भात सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला या तालुक्यातील महत्त्वाच्या शेतकरी प्रतिनिधीं यामध्ये काजू उत्पादक -शास्त्रज्ञ -युनिट धारक असतील .वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्रामध्ये येत्या आठवड्यात त्वरित ही बैठक लावून त्यातून काजू साठी एक रोल मॉडेल तयार करून त्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्याचे निश्चित करण्यात आल .यासंदर्भात पालकमंत्री श्री नितेश राणे व पणनमंत्री श्री ना . श्री . जयकुमार रावल साहेब यांच्यासोबत काजू बोर्ड व पणन खातही सहकार्य करणार आहे .वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञही आपला मोलाचा सहभाग दाखवून काजू साठी भविष्यात उर्जितावस्थेसाठी नवसंशोधन व दिशा दर्शक होणार आहेत .काजू फळ पिकाबाबत ए आय तंत्रज्ञान वापरून काजूची उत्पादकता कशी वाढेल यावरही चर्चा झाली .काजू लागवड -उत्पादन वाढ -व मार्केटिंग यासंदर्भात वेगवेगळी जबाबदारी विभागून देऊन नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याबद्दलही श्री मनीष दळवी यांनी सुचित केले .सिंधुदुर्ग ब्रँड निर्माण करून त्याचं मार्केटिंग करणे व परकीय देशातून आलेल्या काजूचं वेगळं मार्केटिंग करणे यावरही चर्चा झाली .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या मोठा आकार व जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाला शेतकऱ्यांसमोर आणून त्याची लागवड करण्यास प्रेरित करण्यासाठी अनुदान जिल्हा बँकेतून देण्याचा विचारही श्री मनीष दळवी यांनी व्यक्त केला .शेतकरी संघटना अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत या सर्व संघटना व काजू प्रकल्प युनिट एकत्र येऊन सिंधुदुर्गातील जीआय मानांकित काजूला जागतिक ब्रँड बनवूया असे आवाहनही श्री दळवी यांनी केले .या सर्व प्रक्रियेत शेतकरी संघटनांना सहभागी करण्याबद्दलच्या कल्पनेबद्दल सिंधुदुर्ग संघाचे अध्यक्ष श्री विलास सावंत यांनी आभार मानले व जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन निश्चितच काजूला सुगीचे दिवस आणू असा विश्वास श्री सावंत यांनी व्यक्त केला .सह्याद्रीचे चेअरमन श्री दाजी व उर्फ चंद्रशेखर देसाई यांनी सेंद्रिय काजू त्यावर प्रक्रिया व गोडाऊन या संदर्भात पडवे माजगाव येथे असलेला आपला सह्याद्रीचा प्रकल्प वापरण्यास देण्याचे जाहीर केले .यामुळे निश्चितच सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचे काम लवकरच सुरू होईल .
