
दिनांक: ०६/०४/२०२६
बांदा: प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत पिंपळेश्वर मंदिर ते गाळेल या मार्गावरील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क अधिक सुलभ होणार असून स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
या मार्गातील सटमटवाडी ते गाळेल या रस्त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ते काम पूर्णत्वाकडे जात असतानाच आता पुढील टप्प्यात पिंपळेश्वर मंदिर ते हायवे जोडणाऱ्या रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर बांदा येथील माजी सरपंच आबा धारगळकर तसेच दर्पण आळवे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
