आताच शेअर करा

दिनांक: १३/०३/२०२६

बांदा: पीएमश्री केंद्र शाळा बांदा नंबर एक या ठिकाणी माजी विद्यार्थी संघ यांची सभा घेण्यात आली. याचवेळी तंबाखूमुक्त व  नशा मुक्त भारत अभियान या विषयांतर्गत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन डॉक्टर ॲड. सगुण बाबुराव जाधव राहणार मळेवाड ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे) चे समता दूत यांनी हे मार्गदर्शन दिले. यावेळी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री अजय शंकर महाजन,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रत्नाकर गणपत आगलावे, बांदा गावचे पोलीस पाटील आना श्री.भदू गवस, सुरक्षा समिती समुपदेशक सौ.उर्मिला महादेव सावंत मोर्ये, विद्यार्थी सुरक्षा समिती ॲडव्होकेट श्री.परेश बाळा सावंत, श्री .नंदू भिकाजी बांदेकर श्री.रवींद्र विठू सावंत, श्री .अन्वर अहमद खान, श्री .हेमंत अरुण मोर्ये, श्री .राकेश किसन केसरकर हे उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या वेळी सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. काळाची गरज नशा मुक्त भारत होणे गरजेचे आहे. मुलांना व्यसनापासून  राहून एक चांगला नागरिक घडवणे हे आजच्या भारताचे उद्दिष्ट आहे. त्यासाठीचे मार्गदर्शन डॉक्टर जाधव यांनी उत्तम प्रकारे केले.शिवाय मुलांकडून प्रात्यक्षिकही करून घेतले. नाही म्हणा या वाक्यावर जोर देत प्रत्येक मुलाकडनं ते वदलून घेतले अशा या कार्यक्रमाची सर्व ठिकाणी यशस्वीरिता पार पडणे गरजेचे आहे. कारण नशा मुक्त होणे हे सर्वांसमोरचे एक उद्दिष्ट आहे. डॉक्टर जाधव यांचे सर्व सदस्यांनी आभार मानले. तसेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री शांताराम महादेव असनकर सरांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.शाळेतील सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *