
दिनांक: १३/०३/२०२६
सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या वतीने “नारी आरोग्य महोत्सव – सक्षम स्त्री, सक्षम समाज” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील महिलांचे कर्तृत्व गौरविणे, त्यांना प्रेरणा देणे तसेच स्त्रीशक्तीचा सन्मान करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात येणार असून जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात पारंपरिक हळदी-कुंकू समारंभ तसेच महिलांसाठी ‘सौभाग्य संध्या’ या विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी मा. सौ. वैदिका विशाल परब (सामाजिक कार्यकर्त्या) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
