आताच शेअर करा

दिनांक:  १३/०३/२०२६

बांदा : रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा तसेच मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे.

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या काळात अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे अनेक रुग्णांना रक्ताची तातडीची गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन केलेले रक्तदान अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे तीन ते चार रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त युवक, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा व मराठा समाज बांदा यांच्यावतीने सर्व स्तरातील नागरिकांना सहभागासाठी निमंत्रित करण्यात आले असून समाजहिताच्या या कार्यात सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आयोजकांनी सांगितले आहे. या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा चे अध्यक्ष रोहन कुबडे तसेच बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *