आताच शेअर करा

दिनांक: ०७/०३/२०२६

बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडूरा नंबर १ चा १०९ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते अविरत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मडूरा नंबर १ शाळेने १०९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या शाळेची स्थापना ३ मार्च १९१८ रोजी झाली.
३ मार्च २०२६ला या  शाळेने १०९ वर्षात पदार्पण करत आहे .या शाळेने आपल्या कारकिर्दीत अनेक हिरे व मोहरे घडवले आहे.  शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर, सरकारी  हुद्यावर काम करत आहेत. कुणी व्यवसायत तर कुणी राजकारणात आपले नाव उचस्थरावर उमटवीत  आहेत..१०९ वर्षात पण ही शाळा त्यापद्धतीचेच धडे आज विद्यार्थी गिरवताना दिसत आहेत.३ मार्च रोजी हा सोहळा साजरा होत असताना  मडूरा गावचे सरपंच    श्री उदय चिंदरकर, उपसरपंच कृष्णा गावडे, पोलीस पाटील पोलीस प नितीन नाईक,  शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष समिती  एकनाथ खर्डे , उपाध्यक्ष श्रीमती  पुनम गोवेकर,  सर्व सदस्य  माजी पालक माजी  ग्रामस्थ मुख्याध्यापक,  शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत  वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी  सरपंच, उप सरपंच,  पोलीस पाटील,  यांनी शाळेबद्दल उपक्रमशील  शाळा  असे गौरव उदगार काढले. व  शाळेच्या भौतिक गरजा  करण्याचे पूर्ण करण्याचे आश्वासन  दिले.  तसेच  सर्व शाळा व्यवस्थापक समितीचे शाळा आजी व  माजी पालक यांचे आभार मानले. मुख्याध्यापक मुख्याध्यापक श्रीमती आरोसकर यांनी  पाहुण्यांचे स्वागत केले  उपशिक्षक   श्री. बरागडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *