आताच शेअर करा

दिनांक: ०८/०३/२०२६

बांदा: बुधवार दिनांक ४ मार्च  २०२६ रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.1 येथे महिला बालविकास विभाग कार्यालय सिंधुदुर्गअंतर्गत’ सखी वन टॉप, सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने गुड  टच, बॅड टच, मोबाईलचे दुष्परिणाम व सायबर क्राईम या संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना गुड टच अँड बॅड टच तसेच मोबाईलचे दुष्परिणाम व सायबर क्राईमच्या संदर्भात उपयुक्त असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करत असताना सिंधुदुर्ग प्रभारी केंद्र प्रशासक व समुपदेशक एडवोकेट रूपाली प्रभू यांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगताना मोबाईल का वापरू नये हे सांगितले यामध्ये एखादी लिंक ओपन झाली आणि चुकून कुठेतरी गुगल पे सारख्या गोष्टी ओपन होऊन आपल्या पालकांचे नुकसान होऊ शकते तसेच फोटो एडिट करून आपली आणि आपल्या नातेवाईकांची बदनामी होऊ शकते .शारीरिक, मानसिक ,बौद्धिक या संदर्भात आपले नुकसान आपली हानी होऊ शकते या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन  एडवोकेट रूपाली प्रभू यांनी केले .यावेळी मुलांना , हा जास्त गोंधळ हा वयस्क मंडळ मध्ये दिसून येतो आणि म्हणूनच आपण घरी गेल्यानंतर आपल्या आजोबांना ,वडिलांना  यासंदर्भात जागृत करून हे नुकसान आपण टाळू शकतो ही जबाबदारी आपण लहान मुलांनी घेऊन आपल्या घराचे नुकसान टाळू शकतोत्यांची काळजी घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करण्यात आले प्रथम मुख्याध्यापक श्री शांताराम असकर यांनी एडवोकेट रूपाली प्रभू आणि एडवोकेट मीनाक्षी नाईक यांचे स्वागत केले .एडवोकेट मीनाक्षी नाईक यांनी सायबर क्राईम गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले यामध्ये सायबर गुन्हा घडल्यास मदतीसाठी १९३० या नंबर वर कॉल करून संपर्क करू आपण मदत मागू शकता तसेच १०९८  हा नंबर 0 ते १८ वयोगटातील बालक बालकांनी संपर्क करून अन्याय विरुद्ध किंवा मदतीसाठी आपण हा कॉल करून मदत मागू शकता तर ११२ हा नंबर पोलिसांकडे मदत मागून  शकताअशा प्रकारे उपयुक्त माहिती मीनाक्षी नाईकयांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक श्री उदय सावळ सर यांनी केले तर मुख्याध्यापक श्री शांताराम महादेव असनकर ,पदवीधर शिक्षक उदय गजानन सावळ पदवीधर शिक्षिका कृपा संजय कांबळे, श्रीमती अर्चना दशरथ देसाई श्रीमती जागृती जयवंत धुरी, श्री रंगनाथ चंद्रकांत परब, श्रीमती कृणाली कृणाल मस्के, श्री फ्रान्सिस देवदास फर्नांडिस, श्रीमती मनीषा दामोदर मोरे, श्रीमती स्नेहा गणेश घाडीआणि श्री प्रसेंजित बोचे  संपूर्ण व्यवस्थापन समिती टीम आणि सर्व समित्या यांनी विशेष परिश्रम घेतले सर्वांनी कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले. शेवटी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *